Share

“आमच्या धनुभांऊवर पूर्ण विश्वास”-आ. संदीप क्षीरसागर

Published On: 

बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनजंय मुंडे यांच्यावर महिलेने केलेल्या आरोपामुळे ते अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या पक्षातील काही नेते या प्रकणावर मौन बाळगून आहेत. तर काहींनी हे त्यांचे वैयक्तिक प्रकरण असल्याचे सांगत अधिक भाष्य करणे टाळलेय. राष्ट्रवादीने त्यांची अप्रत्यक्षरित्या पाठराखण केल्याचे पाहायला मिळतेय. यानंतर बीडमधील धनजंय यांचे सहकारी आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनजंय मुंडे यांचे जाहीरपणे समर्थन केले आहे.

“आमच्या धनुभांऊ वर आमचा पूर्ण विश्वास आहे” असे म्हणत संदीप यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘प्रतिवर्षी सर्वधर्मीय सार्वजनिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून त्या सोहळ्यातील सर्व मुलींच्या पाठीशी भावाप्रमाणे उभा राहणाऱ्या धनुभाऊंवर असले नीच आरोप करण्यात आले हे घृणास्पद आहे, या आरोपांचा व आरोप करणाऱ्यांचा मी निषेध करतो. वेळ कोणती ही असो आम्ही संघर्षयोध्या सोबत आहोत.’

https://www.facebook.com/MLASandeepKshirsagar/posts/4283063845041497

दरम्यान, पक्षाकडून धनंजय मुंडे यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीने मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!