औरंगाबाद : पैसे घेण्यासाठी नातेवाईकांकडे आल्यावर वाद झाला. यातून महिलेच्या गळा, पोटावर चाकूचे सहा वार केले. यानंतर पोत्यात टाकून महिलेस कालव्याच्या पाण्यात टाकून दिले. रक्तबंबाळ अवस्थेत महिलेने पोत्यातून बाहेर येत जीव वाचवला. १३ जानेवारीला रात्री अंबड तालुक्यातील वडीगोद्रीजवळ ही घटना घडली. सुशीला राठोड (नायगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलडाणा) असे महिलेचे नाव आहे. औरंगाबादेतील घाटीत तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सुशीला या अंबड तालुक्यातील डोणगाव तांडा येथील नातेवाइकांकडे पैसे घेण्यासाठी आल्या होत्या. वाद झाल्यानंतर काही जणांनी त्यांना कारमध्ये टाकले व नंतर गळ्यावर, पोटावर चाकूने सहा वार केले. त्यांचा मृत्यू झाला असे समजून आरोपींनी त्यांना पोत्यात बांधून जवळील जायकवाडीच्या डाव्या कालव्यात टाकले. पाण्यात व पोत्यातून कसेबसे बाहेर पडून त्यांनी सुटका करून घेतली.
दरम्यान, गोंदीचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत वारे यांनी सुशीला यांनी सांगितलेल्या वर्णनावरून व मोबाइल क्रमांकावरून आरोपींचा रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला. अंकुश राठोड, रवी अंकुश राठोड व एक महिला यांनी वार केल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- हेगडेंचे आरोप बोगस, तर मुंडेंवर एफआयआर दाखल करण्यापासून विचलित केलं जातंय – रेणू शर्मा
- राजकीय गोटात खळबळ : विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- कोणाच्या जाण्याने भाजपला फरक पडत नाही; महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला
- आघाडीत बिघाडी? ठाकरेंच्या कार्यक्रमातून काँग्रेस-राष्ट्रवादीला वगळले
- ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रोहिणी गोडबोले यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

