Share

‘असा सोशल मीडिया बनवा ज्या वरून माझे वडिल बॅन होणार नाही’

Published On: 

वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत पराभव झाल्यानंतर त्यानंतर देखील डोनाल्ड ट्रम्प यांची आगपाखड सुरूच होती. या दरम्यान समर्थकांनी संसद भवन आणि व्हाइट हाऊसमध्ये तुफान राडा केला. यावेळी हॉलीवूडच्या एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल असे नाट्य अमेरिकन संसदेवर रंगले होते.

त्यांनतर जगभरातून ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. तर संसदेत देखील त्यांच्या वर महाभियोग आणण्यात यावा यासाठी मागणी जोर धरत होती. या दरम्यान त्यांच्या वर सोशल मिडिया कडून कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या काही दिवसांत अनेक धक्के बसले आहेत. यामध्ये फेसबुक, ट्वीटर नंतर आता ट्रम्प यांचे युट्यूब चॅनेल आणि स्नॅपचॅट देखील बंद करण्यात आल आहे.

त्यानंतर आता ट्रम्प यांचा मुलगा ट्रम्प ज्युनिअर याने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला आणि स्पॅस एक्स कंपन्यांचे मालक एलन मस्क यांच्याकडे एक मागणी केली आहे यामध्ये त्याने त्यांना आशा सोशल मीडिया बनवण्यास सांगितले आहे की ज्यावरून आपले वडील डोनाल्ड ट्रम्प यांना बॅन केले जाणार नाही.

त्याच बरोबर त्यांनी असं देखील म्हटलं की, सोशल मीडिया असा असायला हवा की ज्यावर आपले विचार इतरांशी शेअर करता येतील ज्यावर कोणाचं नियंत्रण नसेल तर एलन असा प्लॅटफॉर्म तयार करू शकतील जो अमेरिकेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याला वाचवेल

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!