Share

लस निर्यातीवर बंदी असताना देखील ब्राझीलच्या मदतीसाठी भारत पुढे

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाच्या देशव्यापी लसीकरणाला अवघे काही तास उरले असतानाच आता ब्राझीलने भारताकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. ब्राझीलमध्ये यापूर्वीच लसीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र, चिनी बनावटीची सिनोव्हॅक लशीची परिणामकारकता खूपच कमी असल्याने ब्राझीलच्या अडचणी पुन्हा वाढल्या होत्या. त्यामुळे आता ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मदतीची याचना केली आहे.

ब्राझीलला या लशीची इतकी निकड आहे की, केंद्र सरकारने कोणतीही परवानगी देण्यापूर्वीच ब्राझीलचे विमान भारतात दाखल होणार आहे. ब्राझीलला 20 लाख लसींची गरज आहे. त्यासाठी या विमानात विशेष कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. ब्राझीलच्या परराष्ट्रमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार अजुल एअरलाईन्सचे ए 330 नियो हे विमान भारतात दाखल होणार आहे. उणे तापमानात लसींची वाहतूक करण्यासाठी या विमानात विशेष कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने कोरोना लसीच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी आता सीरम इन्स्टिट्यूट आणि ब्राझील सरकारमध्ये एक करार झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार ‘सीरम’कडून ब्राझीलला कोव्हिशील्ड लसीचे 20 लाख डोस पुरवले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, ब्राझील सरकार भारत बायोटेककडूनही ‘कोव्हॅक्सीन’ लसीच्या काही कुप्या खरेदी करणार असल्याची माहिती आहे.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टि्यूटच्या कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारताची लसींची गरज पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम राहणार होती. मग आता अचानक ब्राझीलला लसी का दिल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. भारताने गरजेपेक्षा अधिक लसींचा साठा करुन ठेवण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे उर्वरित लसींची निर्यात केली तरी त्यामुळे भारताच्या लसीकरण कार्यक्रमाला कोणताही फटका बसणार नाही.

दरम्यान, राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जात आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आले आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!