🕒 1 min read
औरंगाबाद : सायबर पोलीस ऑनलाइन फसवणूक कशी होते, त्यात लोकांना कशा प्रकारे फसवले जाते याची जनजागृती नेहमी करत असतात. असे असतानाही ओएलएक्स अॅपवर दुचाकीची जाहिरात देऊन परप्रांतीय भामट्याने शेतकऱ्याला 52 हजारांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या भामट्याने आपण नाशिक येथे सैन्यदलात नोकरीस असल्याची थाप शेतकऱ्याला मारली होती. मिथुन केशव पवार (रा. कांचनवाडी) यांनी ओएलएक्स अॅपवर दुचाकी (एमएच-१४-एचजे-०४२१) विक्रीला असल्याची जाहिरात पाहिली होती. त्यावरून त्यांनी दुचाकी खरेदीसाठी मालकाशी संपर्क साधला. तेव्हा त्याने दुचाकीची किंमत 55 हजार रुपये असल्याचे सांगितले.
याचदरम्यान त्याने आपण नाशिक येथे सैन्यदलात असल्याचे सांगून आर्मी ट्रान्सपोर्टने दुचाकी पाठवतो असेही म्हटले. यामुळे पवार यांनी मोबाइलद्वारे त्याला ५१ हजार ८७८ रुपये पाठवले. परंतु, अनेक दिवस उलटूनही दुचाकी न मिळाल्याने पवार यांना शंका आली. त्यावरून पवार यांनी सातारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक सुरेंद्र माळाळे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- उद्या लोकसभेत महत्त्वाची विधेयके पास होण्याची शक्यता, भाजपचा खासदारांना व्हीप जारी
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- तामिळनाडू : फटाका फॅक्टरीतील स्फोटात 11 ठार, PM-CM कडून मदत जाहीर
- ‘शेतकऱ्यांपुढे इंग्रज टिकू शकले नव्हते, मग मोदी कोण लागून गेलेत?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
