दिसपूर : निवडणुका आल्या की मतदारांवर योजनांचा लयलूट होत असते. एकीकडे देशात पेट्रोलने सर्वाधिक दराची पातळी गाठलेली असताना आसाममध्ये मात्र ते 5 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतात. आजकाल देशभरात इंधनाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. भाजपशासित आसाममध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. याशिवाय तेथील दारूवरील कर 25 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.
यावर्षी आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ आणि केंद्र शासित प्रदेश पुडुचेरी या पाच ठिकाणी विधानसभा निवडणुका होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडणूक आयोग या राज्यांमधील निवडणुकांचे वेळापत्रक फेब्रुवारीअखेर कधीही जाहीर करू शकते. तत्पूर्वी, निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोगाचे पथक सध्या दक्षिणेकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या दौऱ्यावर आहे.
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक पॅनेल फेब्रुवारीच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या सुरुवातीस या राज्यांकरिता सविस्तर निवडणूक वेळापत्रक जाहीर करू शकते. सूत्रांनी सांगितले की, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात मतदान होणार आहेत. पश्चिम बंगाल येथे सहा ते आठ टप्प्यांमध्ये मतदान होऊ शकते. आसाममध्ये दोन ते तीन टप्प्यांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तरी मतमोजणी मात्र सर्व राज्यांत एकाच दिवशी होईल.
महत्वाच्या बातम्या
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- पूजा चव्हाण प्रकरण : धक्कादायक ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याने उडाली खळबळ
- गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे; राणेंची गंभीर टीका
- जालना: ओपीडी सुरू, मात्र जिल्हा रुग्णालयाकडून ना प्रसिद्धिपत्रक, ना आवाहन; रुग्णांना मनस्ताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
