🕒 1 min read
जयपूर : दिल्लीच्या सीमेवर मागच्या 78 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी हनुमानगडमधील एका सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जमिनी कुणा एकाच्या हातात जाऊ नये, हाच काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण नव्या कायद्यांमध्ये उलट प्रयत्न होत आहेत. देशातील शेतकऱ्यांसमोर इंग्रजांचाही निभाव लागला नव्हता, मग मोदी कोण लागून गेले आहेत?, असेही ते म्हणाले.
कांग्रेस पार्टी की हमेशा कोशिश रही है कि इस बिजनेस को हम कभी किसी एक व्यक्ति के हाथ में ना जाने दें। आजादी के दिन से अब तक हमारा लक्ष्य यही रहा है कि खेती हिंदुस्तान की 40% जनता का ही बिजनेस रहे : श्री @RahulGandhi#RahulGandhiExposesBJP pic.twitter.com/DQ4RwKHUWY
— Congress (@INCIndia) February 12, 2021
सभेदरम्यान राहुल गांधी म्हणाले, ‘मोदीजी म्हणतात आम्हाला शेतकऱ्यांशी संवाद साधायचाय, तुम्हाला काय बोलायचंय? कृषी कायदे रद्द करा, शेतकरी तुमच्याशी चर्चा करतील. तुम्ही (मोदी) त्यांची जमीन, भविष्य हिरावून घेत आहात आणि अशा परिस्थितीत त्यांच्याशी बोलू इच्छिता. आधी कायदा मागे घ्या, मग बोला.’
राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘या तीन कायद्यांचा खरा हेतू काय आहे? मोदीजी ते का आणत आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. शेती हा जगातील सर्वात मोठा व्यवसाय आहे, कारण यामुळे कोट्यवधी लोकांना अन्न मिळते. भारतातील 40 टक्के लोकसंख्या हा व्यवसाय चालवते. शेती कोणाच्याही हातात जाऊ नये यासाठी कॉंग्रेस प्रयत्न करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- तामिळनाडू : फटाका फॅक्टरीतील स्फोटात 11 ठार, PM-CM कडून मदत जाहीर
- जालना: ओपीडी सुरू, मात्र जिल्हा रुग्णालयाकडून ना प्रसिद्धिपत्रक, ना आवाहन; रुग्णांना मनस्ताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
