Share

उद्या लोकसभेत महत्त्वाची विधेयके पास होण्याची शक्यता, भाजपचा खासदारांना व्हीप जारी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व खासदारांना एक व्हिप जारी केला असून, त्यानुसार शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून लोकसभेत उपस्थिती अनिवार्य केली आहे. पक्षाने लोकसभेतील आपल्या खासदारांना हा व्हीप जारी केला आहे. ‘लोकसभेतील आवश्यक कामकाजाकरिता’ त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

व्हिपमध्ये नमूद केलंय की, शनिवारी एक अत्यंत महत्त्वाचे लोकसभेचे कामकाज होईल. लोकसभेतील भाजपच्या सर्व सदस्यांना ही माहिती देण्यात आली आहे. आवश्यक विधेयकांवर चर्चा होईल आणि ते मंजूर करावे लागेल. म्हणूनच, पक्षाच्या सर्व सदस्यांना सकाळी दहा वाजेपासून सदनात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. खासदारांनी लोकसभेत सरकारच्या निर्णयांचे समर्थन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांकडून कृषी कायदे आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून भाजपाप्रणीत केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. गुरुवारी कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ‘हा अर्थसंकल्प श्रीमंतांनी, श्रीमंतांसाठी आणला आहे,’ असे म्हणत बजेटवर टीका केली.

यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पाचा बचाव करताना काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी राज्यसभेत सांगितले की, मुद्रा योजनेंतर्गत आतापर्यंत 27 हजार कोटींहून अधिक कर्ज मंजूर झाले आहेत. ही कर्ज कोणी घेतली असे विचारले, एखाद्या जावयाने घेतली का? असे म्हणत निर्मला सीतारमण यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!