मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. येत्या 29 तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे.
दरम्यान, आता खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाच्या चौकशीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती पुढे येत आहे.वर्षा राऊत यांनी सोमवारी ईडीला यासंदर्भात पत्र पाठवलं होतं. या पत्रात त्यांनी चौकशीला हजर होण्यासाठी अधिकचा अवधी हवा असल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.
दरम्यान,ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो. मी अद्याप ईडीची नोटीस पाहिली नाही, त्याची मला गरजही वाटत नाही, पण तिचं उत्तर देणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडी पुढे आपले म्हणणे सादर करण्याऐवजी खा.राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कांगावा केला’
- ‘संजय राऊतांनी कंपाउंडरऐवजी डॉक्टरांकडून औषधे घेऊन मनस्थिती ठीक करावी’
- ‘कंगनाला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही म्हणून केलेला आकांत तांडव हा मर्दपणा होता का ?’
- भारताला एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून ओळख देण्यात काँग्रेसचे मोलाचे योगदान – बाळासाहेब थोरात
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली


