Share

शिवसेनेत आहे, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटिस आल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे. पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला.

मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला. सध्या ईडीसारख्या सरकारी संस्थांना काही काम राहिलेलं नाही. भाजपच्या विरोधकांचा मानसिक छळ करणे हे त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!