Share

सोनूच्या ‘आय एम नॉट मसिहा’ पुस्तकाला मांजरेकरांच्या मुलीने दिल्या शुभेच्या!

Published On: 

मुंबई : करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य सोनू सूदने केले. दरम्यान सोनूच्या या कामगिरीवर पुस्तक देखील आले आहे, ज्याला ‘आय एम नो मशीहा’ असे म्हणतात. सोनूने आपल्या ट्विटर पृष्ठावरील एका व्हिडिओच्या माध्यमातून या पुस्तकाची माहिती शेअर केली आहे.

सोनू सूदचं एक नवं पुस्तक वाचकांच्या भेटीस आलं आहे. ‘आय एम नॉट मसिहा’ असं या पुस्तकाचं नाव आहे. नुकतंच हे पुस्तक प्रकाशित झालं. लक्षवेधी बाब म्हणजे हे पुस्तक अॅमेझॉन आणि किंडल सारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. अभिनेत्री सई मांजरेकरनं या पुस्तकासाठी सोनूला शुभेच्छा दिल्या आहेत. करोना काळात लोकांची मदत करताना आलेले अनुभव त्याने या पुस्तकातून सांगितले आहेत. हे पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास सोनूने व्यक्त केला आहे. या पुस्तकाचं कव्हर पेज त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. दरम्यान लोकांची मदत करताना आलेले विविध अनुभव सोनू एका पुस्तकाच्या रुपाने देशवासीयांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!