Share

‘राज्यासाठी एक आठवड्याचा लॉकडाऊन पुरेसा नाही, आधी नागरिकांना पुरेसा वेळ दिला जाईल’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

यामुळे राज्याच्या विविध भागासह परराज्यातून उपजीविकेसाठी मोठ्या शहरात आलेल्या नोकरदार, कामगार-मजूर वर्गाने पुन्हा एकदा आपल्या गावाची वाट धरली आहे. गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन केल्यामुळे मजुरांना अक्षरशः पायी गावी जावे लागले होते. यावेळी त्यांची मोठी हालअपेष्टा झाली होती. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच या लोकांनी गाव गाठण्यासाठी मिळेल रेल्वेसह मिळेल त्या साधनाने गावी जाण्याचा मार्ग निवडला आहे.

मागील वेळेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्याने काहीशी भीती देखील लोकांमध्ये निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोणीही घाबरून जाण्याची गरज नसून गावी परतण्यासाठी, आवश्यक सोय करण्यासाठी किमान वेळ दिला जाईल असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील याबाबत सकारात्मक असल्याची माहिती दिली आहे.

‘राज्यात एक आठवड्याचा लॉकडाउन पुरेसा नाही. किमान १४ दिवसांचा असावं असं सगळ्याचं मत आहे. अर्थात, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तो दोन आठवड्यांचा असावा किंवा कमी असावा किंवा जास्त असावा यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील,’ असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

लॉकडाऊन नेमका कसा असेल ? निर्बंध तसेच सवलती काय असतील ?

‘राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी जवळपास झाली आहे. लॉकडाऊन नेमका कसा असेल? त्यात नेमके काय निर्बंध असतील? काय सवलती असतील? याबाबत मुख्यमंत्री ठाकरे आज किंवा उद्या घोषणा करतील.’ अशी माहिती देखील वडेट्टीवार यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!