Share

PAK vs WI 2022 : बाबर आझमच्या खेळीनं अन् मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीने वेस्टइंडिज गारद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने वेस्टइंडिजचा १२० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह पाकिस्तानच्या संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इमाम-उल-हकच्या ७२ आणि कर्णधार बाबर आझमच्या ७७ धावांच्या जोरावर पाकिस्तानने वेस्टइंडिजसमोर २७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

वेस्टइंडिजचा डाव १५५ धावांवर आटोपला

लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टइंडिजची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या ४ धावांच्या स्कोअरवर त्यांना पहिला धक्का बसला. यानंतर काइल मेयर्स आणि शामराह ब्रूक्स यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६७ धावा जोडून डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण ७१ धावांवर काइल मेयर्सच्या रूपात वेस्टइंडिजने दुसरा गडी गमावला. त्यानंतर वेस्टइंडिजचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि एकानंतर एक गडी बाद होत गेले. वेस्टइंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या १५५ धावांत गारद झाला. वेस्टइंडिजकडून सर्वाधिक धावा शमराह ब्रूक्सच्या बॅटमधून आल्या. त्याने ४२ आणि काइल मेयर्सने ३३ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने शानदार गोलंदाजी करताना ४ बळी घेत वेस्टइंडिजला सामन्यातून बाद केले. नवाजशिवाय मोहम्मद वसीम ज्युनियरने ३ बळी घेतले.

३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी

या विजयासह पाकिस्तानने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने वेस्टइंडिजचा ५ गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यात कर्णधार बाबर आझमने १०३ धावा केल्या होत्या. या मालिकेतील तिसरा सामना १२ जून रोजी त्याच मैदानावर खेळवला जाईल जिथे पाकिस्तान वेस्टइंडिजला क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!