मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपने नक्कीच जागा जिंकली, पण त्यांचा विजय झाला असे मी समजत नाही, असे म्हटले. यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“भाजपने जागा जिंकली पण मी त्यांचा विजय मानत नाही इति संजय राऊत. देश संविधानानुसार चालतो…तुमच्या मानण्या न मानण्यावर नाही हो सर्वज्ञानी.”, असा टोला चित्रा वाघ यांनी ट्वीट करत लगावला आहे.
भाजपने जागा जिंकली पण मी त्यांचा विजय मानत नाही इति संजय राऊत.
देश संविधानानुसार चालतो…तुमच्या मानण्या न मानण्यावर नाही हो सर्वज्ञानी….@rautsanjay61 @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 11, 2022
दरम्यान “संजय पवार यांच्या पराभवानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यथित झाले आहेत. संजय पवार हे हाडाचे शिवसैनिक आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भाजपनं पैशांचा पाऊस पाडला. संजय पवार हे उत्तम रित्या लढले. अशा कार्यकर्त्यांची नोंद पक्ष ठेवत असत.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या दोन जागा निवडून येतील. राष्ट्रवादीच्या दोन जागा निवडून येतील आणि काँग्रेसचा देखील एक उमेदवार निवडून येईल. ज्या कारणासाठी सुहास कांदे यांचं मत बाद केलं. त्याच कारणासाठी आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेतला होता. मात्र फक्त कांदें यांचे मत अवैध ठरवलं. रवी राणा यांनी देखील जे कृत्य होतं त्यांचही मत अवैध व्हायला हवं होतं. असंही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- वीज कोसळण्यापूर्वीच नागरिकांना ‘या’ अँपवरून मिळणार अलर्ट, वाचा सविस्तर माहिती
- राज्यसभा निवडणुकीत दिसून आलेले ‘लगान’ चित्रपटातील ‘लाखा’ कोण?; सचिन सावंत यांनी केली ‘ही मागणी
- “घोडेबाजारात जे विकले गेले त्यांची…” ; संजय राऊतांचा अपक्षांवर हल्लाबोल
- “…तर भाजप आणि तपास यंत्रणांचा पराभव निश्चित होता”, व्हिडिओ पोस्ट करत सचिन सावंत यांची टीका
- विकी कौशलने का केले पुन्हा लग्न? पहा व्हायरल VIDEO

