Share

Vivek Agnihotri : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात उलथापालथ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या वेगळ्या  घडामोडी घडताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशा चर्चा चालू होत्या. पण गुरुवारी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकीय व्यक्तींसोबत अनेक सेलिब्रेटींनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. याच पार्श्वभूमीवर विवेक अग्निहोत्री यांनी पोस्ट शेअर केली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, ‘एकनाथ शिंदे तुम्हाला शुभेच्छा आणि एका डानयनामिक लीडरशिपसाठी देवेंद्र फडणवीस यांनाही शुभेच्छा. अखेर आता आम्ही न घाबरता जगू शकणार आहोत. जय महाराष्ट्र!’

सध्या विवेक अग्निहोत्री यांचे ट्विट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या ट्विटवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. विवेक अग्निहोत्री यांना या ट्विटमुळे ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!