Share

एसटी संपाची महिनापूर्ती; औरंगाबादेत महिनाभरात ३६ कर्मचारी निलंबित, २८ चालक-वाहक रुजू

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण यांसह इतर मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. मंगळवारी ७ डिसेंबर रोजी कर्मचाऱ्यांच्या संपाची महिनापूर्ती झाली. मात्र अजूनपर्यंत संप पूर्णपणे मिटलेला नाही. आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा संप एवढ्या मोठ्या प्रमाणात लांबला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप महिनाभरानंतरही सुरुच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या ढासळलेल्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने प्रवासी मात्र बेहाल झाले आहेत. मात्र या सगळ्या परिस्थितीचा फायदा खाजगी ट्रॅव्हल्स, गाड्यांना होत आहे. अव्वाच्या सव्वा दराने भाडे वाढ करुन खाजगी एजंट मालामाल होत आहेत. मात्र खासगी गाड्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत.

महिनाभरात एसटीचा संप मिटवण्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर हालचाली केल्या गेल्यात. यामध्ये कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्यात आली. इतर काही मागण्याही मान्य करण्यात आल्या. मात्र एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होऊ शकत नाही, या म्हणण्यावर राज्य शासन ठाम राहिले. तर विलीनीकरण झाल्याशिवाय रुजू होणार नाही या आपल्या मागणीवर कर्मचारी अजूनही ठाम आहेत. राज्य शासनाने यावर निलंबनाचे हत्यार उपसून अनेक कर्मचाऱ्यांना रुजू होण्यास भाग पाडले आहे. मात्र ४-८ कर्मचारी संपूर्ण एसटीचा भार पेलू शकत नाही. त्यामुळे अजूनही पूर्ण क्षमतेने लालपरी धावलेली नाही.

औरंगाबादेत धावताहेत मोजक्याच बस

गेल्या महिन्याभरापासून औरंगाबादेतील मध्यवर्ती आणि सिडको बस स्थानकातील चालक-वाहक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र प्रशासनाने सेवा समाप्ती, निलंबनाचे हत्यार उपसून काही कर्मचाऱ्यांना रुजू होण्यास भाग पाडले आहे. यामध्ये मध्यवर्ती बस स्थानकात आत्तापर्यंत ६ चालक तर ४ वाहक रुजू झाले आहेत. तर दररोज ४ ते ५ बस कन्नड, सिल्लोड याठिकाणी धावत आहेत तर आत्तापर्यंत २१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सिडको बस स्थानकात ९ चालक ९ वाहक रुजू झाले असून दररोज ८ ते ९ बसेस जालन्यासाठी धावत आहेत. तरी या ठिकाणी आतापर्यंत १५ कर्मचारी निलंबित झाले असून ४८ कर्मचार्‍यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!