Share

‘या’ प्रसिद्ध मोबाईल कंपनीच्या टॉवरचे साहित्य औरंगाबाद महापालिकेकडून जप्त

Published On: 

औरंगाबाद : शहरात महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याची कामे सुरू आहेत. मंगळवारी (दि.७) मिटमिटा भागात टॉवर उभारण्यासाठी आणलेले साहित्य मनपाकडून जप्त करण्यात आले. यात रिलायन्स, जिओ या प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश आहे.

मिटमिटा परिसरात गट क्रमांक १०४ येथे अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू होते. प्लॉट क्रमांक १ येथील रहिवासी शेख हैदर यांच्या घरावर कंपनीच्या वतीने हा टॉवर उभारला जात होता. मोबाईल कंपनीचे अभियंता अमेय पाटील यांनी संबंधित घर मालकासोबत करारनामा करून टॉवर उभारण्याचे काम सुरू केले. याबाबत परिसरातील नागरिकांनी लेखी तक्रार मनपाकडे केली होती. मंगळवारी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने पाहणी करून लगेच कारवाई केली.

या कारवाईत टॉवरची यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. घरमालक शेख हैदर यांना नोटीस बजावण्यात आली. तसेच कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना अनधिकृत टाॅवर उभारणी करू नये, अशी तोंडी सूचना देण्यात आली. ही कारवाई प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरिक्षक सय्यद जमशेद, रवींद्र देसाई, गणेश भगत, अक्षय मगरे, पोलीस कर्मचारी गायकवाड, महिला पोलीस कर्मचारी पठाण यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!