Share

आयसीसी क्रमवारीत भारतीय फलंदाजांची जबरदस्त झेप, अश्विनलाही झाला मोठा फायदा

Published On: 

नवी दिल्ली : भारत-न्यूझीलंड आणि श्रीलंका-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीनंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. मुंबई कसोटीचा ‘मॅन ऑफ द मॅच’ मयंक अग्रवालने फलंदाजीच्या क्रमवारीत कमालीची प्रगती केली आहे, तर एका डावात 10 बळी घेत इतिहास रचणाऱ्या न्यूझीलंडच्या एजाज पटेलने गोलंदाजीत मोठा फायदा करून घेतला आहे.

मयंक अग्रवालने मुंबई कसोटीत 150 आणि 62 धावांची शानदार खेळी खेळली. याचा त्याला रँकिंगमध्ये फायदा झाला आणि तो 30 स्थानांचा फायदा घेऊन 11व्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय शुभमन गिलने 21 स्थानांची प्रगती करत 45व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतासाठी पहिल्या दहामध्ये रोहित शर्मा पाचव्या आणि विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने 26 स्थानांची प्रगती करत 78 व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा धनंजय डी सिल्वा 12 स्थानांनी प्रगती करत 21 व्या, वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रॅथवेट 10 स्थानांनी प्रगती करत 39 व्या आणि एनक्रुमाह बोनरने 17 स्थानांनी प्रगती करत 42 व्या स्थानावर पोहोचला आहे.

गोलंदाजी क्रमवारीत मुंबई कसोटीच्या एका डावात १० बळी घेण्याचा अनोखा विक्रम करणारा एजाज पटेल २३ स्थानांनी पुढे ३८व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या मोहम्मद सिराजला चार स्थानांनी फायदा झाला असून तो 41व्या स्थानावर आहे. रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर असून त्याला ४३ गुणांचा फायदा आहे.

वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर 1 स्थानाने 14व्या, श्रीलंकेचा लसिथ एम्बुलदेनिया पाच स्थानांनी 32व्या आणि रमेश मेंडिस 18 स्थानांनी प्रगती करत 39व्या स्थानावर पोहोचला आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत जेसन होल्डर पहिल्या स्थानावर कायम आहे, तर अश्विनने एका स्थानावर प्रगती केली आहे. मुंबई कसोटीत न खेळलेला रवींद्र जडेजा दोन स्थानांनी घसरून चौथ्या स्थानावर आला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!