तामिळनाडू: भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमधील जंगलामध्ये अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत (Bipin Rawat), त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून (Chopper Crash) प्रवास करत होते. या दुर्घनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या हेलिकॉप्टरमधील (Army Chopper Crash) घटनेत बिपीन रावत आणि अन्य ३ जण जखमी झाले आहे, असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धक्का बसला असून, याबाबत ट्विट करत ते म्हणाले की, ‘सीडीएस बिपिन रावतजींना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या अपघाताची बातमी ऐकून धक्का बसला. सर्वजण सुरक्षित असावेत यासाठी प्रार्थना करतो.’
Shocked to hear about the tragic crash of helicopter with CoDS Shri Bipin Rawat ji on board.
I pray for everyone's safety, wellbeing.— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 8, 2021
दरम्यान, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे.
या हेलिकॉप्टर अपघाताची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ करण्यात येणार आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर जया बच्चन यांचे ‘लाल टोपी’ घालून प्रत्युत्तर
- तरुण खेळाडूंना करावी लागणार प्रतीक्षा; दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दिग्गजच
- शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात; चंद्रकांत पाटलांचा टोला
- जॅकलीनच्या अडचणीत वाढ; ईडीने समन्स बजावल्यानंतर दिल्ली कार्यालयात हजर
- महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र?, प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

