नवी दिल्ली : भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानने दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनवर (आर. अश्विन) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जहीर खानने अश्विनचे कौतुक केले आणि सांगितले की त्याने स्वतःची एक वेगळीच चमक निर्माण केली आहे.
बल्लेबाजी डॉट कॉमवर जहीर खानने अश्विनवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आर अश्विन कुंबळेचा विक्रम मोडू शकतो. अश्विनने स्वत:ची वेगळी अशी एक प्रतिमा निर्माण केली असून त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे तो सध्या मर्यादित षटकांच्या संघातही आहे. प्रत्येक वेळी त्याच्या हातात चेंडू असतो तेव्हा तो काहीतरी वेगळे करतो. अशीच गोलंदाजी करत राहिल्यास एक दिवस अनिल कुंबळेला मागे टाकेल.
यापूर्वी माजी क्रिकेटर सबा करीमनेही अश्विनबाबत वक्तव्य केले होते. न्यूझीलंड मालिकेत जबरदस्त गोलंदाजी करूनही अश्विनला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात स्थान मिळेल की नाही, हे ठरलेले नाही. दुसरीकडे, सबा करीमचे म्हणणे आहे की, जर अश्विनला वगळण्यात आले, तर त्याला ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगावी लागेल.
आपल्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान सबा करीमने रविचंद्रन अश्विनबद्दल एक विधान केले. ते म्हणाले, मला खात्री आहे की आधी तिथे असलेल्या संघ व्यवस्थापनानेही अश्विनला परदेश दौऱ्यावर न निवडण्याचे कारण दिले असावे. मात्र, आता ही गोष्ट अश्विनला सांगणे फार कठीण जाईल. संघाला ड्रॉपची माहिती देण्यासाठी त्याला वेगळ्या पद्धतीने बोलावे लागेल. मला खात्री आहे की असे निर्णय पुन्हा घ्यावे लागले तर संघ व्यवस्थापन त्यांना चांगले समजावून सांगेल. कामगिरी आणि परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अश्विन हा तुमचा मुख्य गोलंदाज आहे आणि त्याला दक्षिण आफ्रिकेत वगळणे खूप कठीण जाईल
महत्वाच्या बातम्या
- मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर जया बच्चन यांचे ‘लाल टोपी’ घालून प्रत्युत्तर
- तरुण खेळाडूंना करावी लागणार प्रतीक्षा; दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दिग्गजच
- शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात; चंद्रकांत पाटलांचा टोला
- जॅकलीनच्या अडचणीत वाढ; ईडीने समन्स बजावल्यानंतर दिल्ली कार्यालयात हजर
- महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र?, प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट


