मुंबई : महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मेडीक्लेम काढण्यात आला असल्याची माहिती युवक काँग्रेसचे राज्य अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली. अशा पद्धतीने मेडीक्लेम काढणारी ही पहिलीच संघटना असण्याची शक्यताही तांबे यांनी व्यक्त केली आहे. कोरोना काळात घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनासारख्या संकटाच्या काळात प्रत्येक पक्षातील पदाधिकारी आप-आपल्या परीने सर्व सामान्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा कोव्हीड योद्धांची काळजी घेण्याचे आवाहन तांबे यांनी केले आहे. या संदर्भात तांबे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘महामारीच्या या वर्षांत पहिल्या दिवसापासून जनतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या आमच्या महाराष्ट्र युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे #Covid19 करिता आज प्रत्येकी एक लाख रुपयांचे मेडीक्लेम केले. असे करणारी युवक कॉंग्रेस ही कदाचित पहिलीच संघटना असेल.’
We care for our frontline team !
Arranged a mediclaim of Rs. 1 Lakh for each of Maha Youth Congress office bearers for #Covid19. They r the ones, working diligently for people from Day 1 of these pandemic years.
Maybe v r the only political organization to take this initiative.
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) April 24, 2021
आरोग्य विषयक संकटाच्या काळात राजकीय पक्षाच्या वतीने सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यात युवक काँग्रेसच्या या निर्णयामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांची काळजी घेण्याचे कामही करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा सकारात्मक आणि चांगला उपक्रम आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनानेही सर केले ‘माउंट एव्हरेस्ट’! नॉर्वेचा गिर्यारोहक पॉझिटिव्ह
- शहरात तुटवडा, मनपाने मागवले १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन!
- पीपीई कीट घालत कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी करणाऱ्या खासदार मुंडे यांना कोरोनाची लक्षणे
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- जळकोटमध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालयाची नुसतीच घोषणा !


