औरंगाबाद : पोटुळ ते दौलताबाद दरम्यान रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गौतम सीताराम पवार वय ४० रा. माळीवाडा असे मयत तरुणाचे नाव असून अजिंठा एक्स्प्रेस गाडीच्या समोर येऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
प्राप्त माहिती नुसार, सोमवारी सकाळी अजिंठा एक्स्प्रेसच्या धडकेत तरुण जखमी झाल्याचा मेमो औरंगाबाद स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांना दिला. त्या माहितीच्या आधारे रेल्वे पोलीस पोटुळ ते दौलताबाद दरम्यान जखमी झालेल्या पवारांपर्यंत पोहचले.
दरम्यान, जखमी गौतम पवार यांना रेल्वे पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मयात घोषित केले. तसेच गौतम पवार यांनी अजिंठा एक्स्प्रेस समोर आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करत त्या अनुषंगाने तपास करणार असल्याचे तपासी अमलदार पो. ह. चंद्रविजय प्रधान यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘योगींनी दोन मुलांऐवजी जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे’
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी अन् भूमीपुत्रांवरील अन्याय दूर ; 48 तरुणांची वाचवली नोकरी
- खराब रस्त्यांची दुरुस्ती करा आणि त्यानंतर खुशाल सायकल ट्रॅक बनवा, नागरिकांची मनपाकडे मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

