Share

कोरोनाला हद्दपार करण्याचा नागपूरकरांनी बांधला चंग;जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद

Published On: 

नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर संदीप जोशी यांनी दोन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन नागपूरवासियांना केले होते. या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे शनिवारी दिसून आले आहे.

शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. थोड्याफार अंतरावर एखादी सदनिका अथवा गल्ली कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे सील करण्यात आल्याचे चित्र जागोजागी दिसते आहे. या संसर्गाची गती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावे लागेल अशी पूर्वकल्पनाही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना दिलेली आहे.

या पार्श्वभूमीवर आज व उद्या नागपूरकरांनी जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन आयुक्त व महापौरांनी केले होते. शनिवारी सकाळपासूनच शहरातील सर्वच प्रमुख रस्ते निर्जन दिसून आले. एकामागे एक वाहनांच्या रांगा बघण्याची सवय असलेल्या नागरिकांना रस्त्यावर एकही वाहन दिसले नाही.

जिल्हा प्रशासन तसेच महापालिका आयुक्तांनी शहरात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करीत अत्यावश्यक सेवावगळता सर्व खाजगी कार्यालये , कॉर्पोरेट ऑफिस, दकाने बंद करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले होते.

शहरातील इंदोरा, सक्करदरा, जगनाडे चौक, दिघोरी, मानेवाडा, नरेंद्रनगर, सदर, गड्डीगोदाम, ग्रेट नाग रोड, महाल, इतवारी, सेंट्रल एव्हेन्यू, रामझूला, सिव्हिल लाईन, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ, खामला रोड, ऑरेंज सिटी स्ट्रिट, जयताळा, आयटी पार्क काटोल रोड, कळमना, पारडी , जुना भंडारा रोड, पाचपावली उड्डाणपूल, वर्धा मार्ग, बर्डी, नंदनवन आदी रस्त्यांवर शुकशुकाट होता.

महत्वाच्या बातम्या-

इंदोरीकारांची विखे पाटलांनी घेतली भेट,समाज प्रबोधनाच्या कामाला जाहीर केला पाठींबा

माझं सर्वात मोठं आणि तीव्र ऑब्जेक्शन आहे, माझं वय ८० असताना तुम्ही ८५ म्हणता ?

‘या’ जिल्ह्याचा लॉकडाऊन दोन दिवस आधीच संपला!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!