औरंगाबाद : सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील आरोग्य सुविधांबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश राजेश टोपे यांच्याशी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी मंत्रालयात चर्चा केली. त्यात सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी देण्यात आली. पन्नास खाटांचे रुग्णालय आता शंभर खाटांचे होणार आहे. तसेच इमारत सुसज्ज करणे, फर्दापूर येथे नवीन पीएचसी निर्माण करणे अशा अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील आरोग्य सुविधांबाबत बुधवारी (दि.७) आरोग्य मंत्री टोपे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करून पन्नास खाटांच्या रुग्णालयाला १०० खाटाची मंजुरी देण्यात आली. तसेच मोडकळीस आलेली इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून चार दिवसात प्रस्ताव सादर करणे, फर्दापूर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर सोयगाव रूग्णालयात पन्नास खाटांची मंजुरी, अजिंठा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान आणि संरक्षण भिंत बांधणे आणि मतदारसंघात आवश्यक असलेल्या ठिकाणी पीएससी बांधण्यात संदर्भात चर्चा करण्यात आली.
सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील आरोग्य विभागाची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने औरंगाबाद किंवा जळगाव येथे जावे लागते. त्यामुळे तज्ञ डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासंदर्भात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना विनंती केली. रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रोहयो’तील कामांच्या लेबर बजेटची आखणी करा, जि. प. सीईओंना अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या सूचना
- विमानतळाऐवजी अमरप्रित चौकात हवा उड्डाणपूल, खासदारांसह सर्वच आमदारांची मागणी
- ‘ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत निर्मिती करण्यास प्राधान्य’, नगरकरांना पालकमंत्र्यांचा दिलासा
- शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांची पदोन्नती करणार, शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांची माहिती
- ‘राणे साहेबांचे महत्व काँग्रेसला 10 वर्षात कळाले नाही ते भाजपने 2 वर्षात जाणलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

