औरंगाबाद : औरंगाबाद शहराची सध्याची वस्तुस्थिती सर्वसामान्य जनतेचा कौल, मागणी व प्राथमिकता लक्षात घेता खासदार इम्तियाज जलील यांच्यासह आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदिप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ, आमदार अतुल सावे यांनी उड्डाणपुल चिकलठाणा विमानतळाऐवजी अमरप्रित चौक येथे बांधण्याची मागणी रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. सर्वच लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी व प्रकल्प संचालक यांना सविस्तर माहिती देवून उड्डाणपूल बांधण्याची प्राथमिकता चिकलठाणा विमानतळासमोर नसून अमरप्रित चौक येथे असल्याचे निदर्शनास सुध्दा आणून दिलेले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्व आमदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या पत्रात नमुद केले की, औरंगाबाद शहराच्या विकासासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) विभागातर्फे ७० कोटी इतक्या कमी व मर्यादित निधीची मान्यता देण्यात आलेली आहे. औरंगाबाद शहर चिकलठाणा विमानतळासमोर फक्त एकच उड्डाणपूल, पादचारी क्रॉसिंग पुलांचे रुंदीकरण न करता सध्याच्या रस्त्याचेच नूतनीकरण प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठ अथवा इतरत्र ठिकाणी रहदारी व वाहतूक करण्यासाठी अमरप्रीत चौक या मुख्य रस्त्याचा वापर नागरीकांकडून होतो. त्यामुळे तेथे नेहमी वाहनांची वर्दळ जास्त असल्याने सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. म्हणुन उड्डाणपूलाची आवश्यकता तेथे आहे. प्रस्तावित पादचारी क्रॉसिंग निरुपयोगी आहे, कारण व्यावहारिकदृष्ट्या त्याची उपयुक्तता शून्यइतकीच असल्याने फक्त सरकारी पैशांचा अपव्यय असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्व आमदारांनी दिलेल्या पत्रात नमुद केलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अधिवेशन संपले मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला
- मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या जावडेकरांना डच्चू दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
- ‘तिसऱ्या लाटेतही आपापल्या जिल्ह्यातील उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करा’
- ‘हे येड्यागबाळ्याचे काम नाही’ ; राणेंच्या शपथविधीनंतर निलेश राणेंची खरमरीत प्रतिक्रिया
- पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची फरफट, बँकांचा मनमानी कारभार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
