🕒 1 min read
जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन-जालना रस्त्यावरील बामखेडा पाटी जवळील झालेल्या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चालक व अन्य एक जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहितीनूसार, ट्रक (क्र.एमएच- 18-एए-9296) हा भरधाव वेगाने जालन्याहून भोकरदनकडे येत होता. बामखेडा पाटी जवळील रस्त्यावरील असलेल्या खड्डयाजवळून चालकाने हलगर्जीपणाने ट्रक वेगाने चालवला. यावेळी पुलाजवळ ट्रक आदळून अपघात झाला. या अपघातामध्ये मनीष दिनेश बडोले याचा मृ्त्यू झाला आहे. तर ट्रक चालक महेश गंगाराम बडोले, निशिल नयन सोळंकी हे जखमी झाले. वरील सर्व जण मध्यप्रदेशातील रहिवाशी आहेत.
दरम्यान, बामखेडा पाटी जवळ रस्त्यावर खड्डे पडल्याने यापूर्वी या अनेकदा किरकोळ अपघात झाले होते. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही प्रशासन या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत आहे. या अपघातानंतर तरी रस्त्यांची दुरवस्था दूर करावी अशी मागणी होतेय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधींना ‘हम दो, हमारे दो’ म्हणण्यासाठी आधी लग्न करावं लागेल’
- राणा दाम्पत्याला विना मास्क ‘बुलेट वारी’ पडली महागात, गुन्हा दाखल
- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची दारं भाविकांसाठी पुन्हा बंद !
- पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच आल्या पावली परत फिरल्या तृप्ती देसाई
- काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीत ‘लैला मै लैला’चे लागले ठुमके
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
