Share

संतापजनक ! ‘संजय राठोडांच्या वाढदिनी शिवाजी महाराजांच्या मुर्तीभोवती फेकून दिलेले हार-बुके’

Published On: 

🕒 1 min read

यवतमाळ : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. असं असलं तरी संभाव्य तिसऱ्या लाट आणि डेल्टा प्लस व्हेरियंट प्रसार हे अधिक धोकादायक असल्याने राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत.

आषाढी वारी, गणेशोत्सव यांच्यासह इतर सर्व धर्मियांचे सण-उत्सव, सामान्यांचे कार्यक्रम, व्यवसाय आदी बाबींवर राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत निर्बंध लावले आहेत. मात्र, दुसरीकडे राजकीय पक्षांना मात्र या निर्बंधांतून सूट आहे कि काय ? असा सवाल निर्माण होतोय. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांच्या गराड्यात राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाचे उदघाटन झाले. काँग्रेसचे शिबीर, पक्ष प्रवेश, बैठक हे देखील शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडतंय. राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा देखील मोठ्या प्रमाणात झाली.

हे कमी कि काय सत्तेतील महत्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्याचा वाढदिवस जल्लोषात अक्षरश: लोकांच्या गराड्यात पार पडला. हे म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेतेच त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत आहेत. विरोधी पक्ष देखील कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात मागे नाहीत. त्यामुळे दंड, कारवाई, नियम हे फक्त सामान्य जनतेवरच लागू केले जात असून नेत्यांच्या चुकीची भरपाई देखील या सामन्यांच्या नशिबी येत आहे.

आता शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला असून कोरोना नियमांची पायमल्ली करण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. यावेळी ते फक्त नियमांचं उल्लंघन करून थांबले नाही, तर सबंध महाराष्ट्राचे देशाचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीभोवती आलेले हार-तुरे कसेही टाकण्यात आले.

हा प्रकार समोर आल्यानंतर आता प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनेक नेते महाराजांच्या मूर्तीला पूजतात, नतमस्तक होतात. मात्र, महाराजांची मूर्ती अशा पद्धतीने ठेवून अवमान झाल्याचं दिसून येत आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी याबाबत काल एक ट्विट करून संजय राठोड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

‘शिवसेना आमदार संजय राठोड वाढदिवस साजरा करत असताना मुख्यमंत्र्याचे सगळे आदेश पायदळी तुडवलेतचं शिवाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीभोवती यांचे फेकून दिलेल्या हार इत्यादी. यांच्यापेक्षा मुघल बरे होते की काय अशी म्हणायची पाळी आली आहे,’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!