Share

‘केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन केले. स्व.नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या कृषी दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित कृषी मंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनीही स्व.नाईक यांना अभिवादन केले.

यानंतर, आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदतीची हमी देतानाच केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या. त्यांना कोणतेही कायदे करू द्या, मात्र शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्यापाठी खंबीरपणे उभे आहे,’ असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला आहे.

हमीभाव नाही हमखास भाव देणार !

राज्यातील शेतकऱ्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे, असं देखील ठाकरे म्हणाले. तर, वेळोवेळी नैसर्गिक संकटे येत असतात. सोन्यासारखी पीके या नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असतात. अशा अनिश्चित परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असं सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. यासोबतच, राज्यातील शेतकऱ्यांनी नेहमीच प्रयोग करत राहिले पाहिजे. शेतकऱ्याने यासाठी प्रयोगशील होणे आवश्यक आहे, असं ठाकरेंनी नमूद केलं असून उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्याने जपानमधील आंब्याची जात पिकवून करोडो रुपये कमावल्याचे उदाहरण देखील दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!