मुंबई : हाथरस बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात सध्या असंतोष आहे. देशभरात उत्तर प्रदेश सरकारविरोधात निदर्शनं केली जात आहेत. पीडितेला न्याय मिळावा यासाठी विरोधी पक्ष एकवटले असून भाजप सरकारविरोधात संघर्ष करत आहेत. देशातील विविध पक्ष पीडितेच्या कुटुंबियांना भेट देत त्यांचे सांत्वन करत आहेत.
तर, या कुटुंबावर राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. सुरुवातीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी व काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अडवणूक करत धक्काबुक्की केल्याने उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला जात होता. तसेच पीडित कुटूंबियांना न्याय मिळावा यासाठी देशभरात आंदोलन केली जात आहेत.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून देखील भाजप सरकारवर ताशेरे ओढण्यात आले असून परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली नाही तर हा वाद चिघळण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. एका नटीला वाय प्लस सुरक्षा दिली जाते तर मुलीवर झालेल्या अत्याचारांमुळे पीडित असलेल्या कुटुंबाची सुरक्षा मात्र भगवान भरोसे ठेवली जाते असा घणाघात देखील करण्यात आला आहे.
सामना अग्रलेख :
मुंबईतल्या एका नटीस केंद्र सरकार वाय प्लस सुरक्षा देते, पण हाथरसच्या पीडित मुलीच्या कुटुंबास ‘भगवान भरोसे’ सोडले जाते हे काही समान न्यायाचे तत्त्व नाही. डॉ. आंबेडकरांच्या घटनेला साजेसा हा न्याय नाही. याप्रकरणी अन्यायाचा स्फोट झाला तर दलित समाज संतापून रस्त्यावर उतरेल याचे भान ठेवले पाहिजे. स्वसंरक्षणार्थ दलितांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळावाच, पण शस्त्रखरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळावे अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आता केली. ही पहिली ठिणगी आहे. त्या ठिणगीत तेल ओतण्याचे काम तरी सरकारने करू नये. सरकारने पहिल्या दिवसापासून लपवाछपवी केली नसती तर वातावरण इतके चिघळले नसते. आता बोलून काय
हाथरस बलात्कारप्रकरणी योगी सरकारचे पाय रोज खोलातच जात आहेत. बलात्कारपीडित मुलीचे हत्या प्रकरण पेटते आहे असे दिसताच योगी सरकारने या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देत असल्याची घोषणा केली. मुळात हा तपास सीबीआयकडे सोपवा अशी मागणी कोणी केली? हाथरसच्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी स्पष्ट सांगितले, सीबीआयचा तपास आणि नार्को टेस्ट वगैरेची मागणी आम्ही केलेली नाही. आम्हाला या सर्व प्रकाराची न्यायालयीन चौकशी हवी आहे. गुन्हेगारांना फाशीवर लटकवावे हेच आमचे मागणे आहे, पण योगी सरकारने काय करावे? पोलिसी बळाचा वापर करून पीडित मुलीच्या कुटुंबाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.
तिच्या कुटुंबास जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. संपूर्ण कुटुंब दहशतीखाली जगत आहे. अशा वेळी त्या पीडित मुलीच्या कुटुंबास ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी झाली तर काय चुकले? मुंबईतल्या एका नटीस केंद्र सरकार वाय प्लस सुरक्षा देते, पण हाथरसच्या पीडित मुलीच्या कुटुंबास ‘भगवान भरोसे’ सोडले जाते हे काही समान न्यायाचे तत्त्व नाही. डॉ. आंबेडकरांच्या घटनेला साजेसा हा न्याय नाही. याप्रकरणी अन्यायाचा स्फोट झाला तर दलित समाज संतापून रस्त्यावर उतरेल याचे भान ठेवले पाहिजे.
स्वसंरक्षणार्थ दलितांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळावाच, पण शस्त्रखरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळावे अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आता केली. ही पहिली ठिणगी आहे. त्या ठिणगीत तेल ओतण्याचे काम तरी सरकारने करू नये. आता हाथरसचे भाजपचे माजी आमदार राजवीर सिंग पहलवान यांनी हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ एक मेळावा घेतल्याचे आणि त्याला 500च्या आसपास लोक उपस्थित राहिल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
हा सगळा प्रकार पीडितेच्या कुटुंबीयांवर दहशत पसरविणारा तर आहेच, शिवाय जातीय तणावात आणखी भर टाकणाराच म्हणावा लागेल. कथुआपासून उन्नाव आणि हाथरसपर्यंत हेच घडत आले आहे. प्रत्येक प्रकरणात आरोपींना पाठिंबा देण्याची दडपशाही केली गेली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांची डोकी फोडायची ही कसली लोकशाही? उत्तर प्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने हाथरसला जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली पाहिजे. असे केल्याने सरकारला कमीपणा येणार नाही. उलट त्याच्या मोठेपणाचेच दर्शन होईल.
महत्वाच्या बातम्या :-
- मराठा युवक प्रचंड अस्वस्थ ; राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकला-पूजा मोरे
- हाथरस प्रकरण : पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेलेल्या ‘आप’च्या खासदारावर फेकली शाई
- #IPL2020 : दिल्ली-हैदराबादला मोठा धक्का ;दुखापतीमुळे दोन दिग्गज खेळाडू आयपीएलमधून बाहेर
- ‘दानवे किती रस्त्यावर असतात हे सर्वांना माहित आहे’ ; बाळासाहेब थोरातांचं प्रत्युत्तर
- ‘आम्ही आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी आम्हाला आरक्षण द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

