🕒 1 min read
लखनऊ : हाथरस बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात सध्या असंतोष आहे. देशभरात उत्तर प्रदेश सरकारविरोधात निदर्शनं केली जात आहेत. पीडितेला न्यान मिळावा यासाठी विरोधी पक्ष एकवटले असून भाजप सरकारविरोधात संघर्ष करत आहेत.
देशातील विविध पक्ष पीडितेच्या कुटुंबियांना भेट देत त्यांचे सांत्वन करत आहेत. आज, सोमवारी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली असता यानंतर त्यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकल्याची घटना समोर आली आहे.
दरम्यान,काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे हाथरसला पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्याकरता गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा मार्ग अडवला. परंतू नंतर राहुल गांधी यांची भेट झाली
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्यावर शाई फेकण्याचा सगळा प्रकार अचानक घडल्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला. शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.
पीड़ित परिवार को सांत्वना देने पहुंचे @AamAadmiParty सांसद @SanjayAzadSln जी पर स्याही फेंकवा कर भाजपा ने आज अपने स्याह पक्ष को उजागर कर दिया है।
संजय सिंह जी पर जो स्याही फेंकी गई है उसी स्याही से योगी के काले कारनामों का काला इतिहास लिखा जाएगा। pic.twitter.com/lLAuiCVzzf
— Aam Aadmi Party- Uttar Pradesh (@AAPUttarPradesh) October 5, 2020
घडलेल्या प्रकारानंतर परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण होते. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन आणि उत्तर प्रदेश सराकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
