Share

#IPL2020 : दिल्ली-हैदराबादला मोठा धक्का ;दुखापतीमुळे दोन दिग्गज खेळाडू आयपीएलमधून बाहेर

Published On: 

दुबई- दुखापतींमुळे अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार यंदाच्या हंगामातील आयपीएलच्या  उर्वरित मॅचेस खेळू शकणार नाही.अमित मिश्रा दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळतो तर भुवनेश्वर कुमार सनरायझर्स हैदराबादचा भाग आहे.

उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन भुवनेश्वर कुमार करत असल्याने संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. २ ऑक्टोबर रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी करत असताना भुवनेश्वरला दुखापत झाली होती. पुढे तो सामन्यातून बाहेर पडला होता.

दरम्यान, यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यावेळी नाणेफेक झाल्यानंतर वॉर्नरने सांगितले होते की,दुखापतीमुळे भुवनेश्वर पुढील १-२ सामने खेळू शकणार नाही.पण माध्यमातील वृत्तांनुसार, भुवनेश्वरची दुखापत जास्तच गंभीर असल्यामुळे तो आयपीएल २०२०मधून बाहेर झाला आहे.

तर दुसऱ्या बाजूला दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रालादेखील दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे. अमित मिश्राला बोटाला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएलच्या या मोसमाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे दिल्लीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!