नवी दिल्ली- भारतीय टीमचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना ह्दयविकाराचा झटका आला आहे. दिल्लीतील एका रूग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालीच भारतीय टीमनं विश्वचषक जिंकला होता.
कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होत आहे. दरम्यान, कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.
कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ५२४८ धावा आणि ४३४ बळींची नोंद आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत कपिल यांनी ३७८३ धावा केल्या तसेच २५३ बळी घेतले.
महत्वाच्या बातम्या-
- प्रवाश्यांना मोठा दिलासा; नांदेड-पनवेल व्हाया लातूर विशेष रेल्वे सेवा झाली सुरु
- बिहारमध्ये सत्ता नाही आली तर भाजपा गोर गरिबांकडून लसीचे पैसे घेणार का?
- कौतुक तर व्हायलाच पाहिजे ! भारतीय नौदलात महिला वैमानिकांची पहिली तुकडी कार्यरत
- ‘राष्ट्रवादी सर्व भ्रष्ट नेत्यासाठीचे माहेरघर, त्यामुळे खडसेंचा पक्ष प्रवेश आश्चर्यकारक नाही’
- ‘अनिल देशमुख यांनी ‘तो’ निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपाच्या पोटात गोळा उठला आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

