Share

‘एकेकाळी माझ्याकडे पैसेही नव्हते…’ शरद केळकर जुन्या आठवणीत भावूक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता शरद केळकर हा सिनेसृष्टीतला सर्वात उत्कृष्ट अभिनेता. सगळ्याच भूमिकांमधून तो आपली एक वेगळी छाप निर्माण करतो. आपण त्याला अनेक भूमिकांमध्ये काम केलेले पाहायले आहे. त्याच्या अभिनयाने त्याने अनेकाच्या मनात जागा निर्माण केली आहे. मात्र हे यश मिळविण्यासाठी अथक मेहनत करून अभिनेता शरद केळकरने सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. शरद केळकरने देखील इथ पर्यंत पोहचण्यासाठी त्याच्या काही वाईट काळाचा सामना करावा लागला याबाबत शरदने एका मुलाखतीत सांगितले आहे.

https://www.instagram.com/reel/CSYruARjECn/?utm_source=ig_web_copy_link

शरद केळकर लवकरच मनीष पॉलच्या ‘पोस्टकार्ड’ या टॉक शोमधून भेटीला येणार आहे. मनीषने या शोमधील एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत शरद केळकर त्याच्या संघर्षाच्या दिवसांविषयी सांगितले आहे.

शरदला देखील सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. याबाबत तो म्हणाला की,  ‘लोक विचार करतात की यांच्याकडे मर्सिडीज आहे. चांगले कपडे घालता, चांगली हेअऱ स्टाइल करून फिरतात. मात्र लोकांना यामागची स्टोरी माहित नाही, अनेकांना आधीच्या संघर्षाबद्दल माहित नाही’, माझ्यावर अशी वेळ आली होती की माझ्याकडे पैसे नव्हते, खूप उधारी होती, कर्ज फेडायचं होतं आणि क्रेडिट कार्डही बंद झालं होतं,’ असे म्हणत त्याने त्याच्या अडचणीच्या काळातील अनुभव शेअर केला आहे.

शरद केळकरची ‘लक्ष्मी’ चित्रपटातील तृतियपंथीयाची भूमिका विशेष लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्याच्या कामाच कौतुकही झाले. या मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या अभिनयाच्या जोरोवर अनेकांच्या मनात जागा केली आहे. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने शरद आधिक लोकप्रिय झाला आहे. शरद  ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटासह ‘जर्सी’, ‘देजा वू’, ‘भूज’ या हिंदी चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!