Share

Eknath Shinde | “एकेकाळी इंदिराजींचा होता वट, पण आता टोमणे सेनेसोबत काँग्रेसची झाली फरफट”

Published On: 

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांना लक्ष्य केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची अवस्था पाहून दया येत असल्याचं म्हटलं. त्यानंरत इंदिराबाईंच्या हाताची होती एकेकाळी किती वट, टोमणे सेनेसोबत काँग्रेस ची झाली फरफट, असं म्हणत शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले.

विधानसभेत राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आहेत. तर विधानपरिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे हे विरोधीपक्ष नेते आहेत. यामध्ये काँग्रेसला काहीही मिळालं नाही. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली. इकडे (विधानसभेत) अजित पवार वरती (विधानपरिषदेत) अंबादास दानवे, विचारला का तुम्हाला, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरातला केला. तुम्ही जाहीरपणे बाहेर बोलले की निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. इंदिराबाईंच्या हाताची होती एकेकाळी किती वट, टोमणे सेनेसोबत आता झाली नुसती फरफट, असं म्हणत शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले. त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिवसेनेचा टोमणे सेना असा उल्लेख केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!