🕒 1 min read
Uddhav Thackeray । नवी दिल्ली : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतील दोन गटांचा वाद काही केल्या संपत नाहीये. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होतं. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचं नाव वापरता येणार नाही, असा निकाल दिला होता.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली. तसेच निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याता आदेश बेकायदेशीर असल्याची भूमिका ठाकरे गटाने आज दिल्ली हायकोर्टात मांडली. दिल्ली हायकोर्टात या विषयी जवळपास तास ते दीड तास युक्तीवाद झाला.
मी पक्षाचा अध्यक्ष असून 30 वर्षांपासून पक्ष चालवतोय, प्रथमदर्शनी जे दिसतंय त्यावर निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही, असा दावा उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, “निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सगळ्या बाबी आम्ही पूर्ण केल्या आहेत. आम्ही सर्व कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र सादर केले. तरीदेखील निवडणूक आयोगाने हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला?”, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टात उपस्थित केला. यावर दिल्ली हायकोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय भूमिका घेतं हे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Vidya Chavan | “…तर मुंबईत दिसवसाला लाखोंमध्ये गुन्हे दाखल होतील” ; विद्या चव्हाण यांचे वक्तव्य
- Jayant Patil | “तक्रारीपूर्वी ‘ती’ महिला एकनाथ शिंदेंना भेटली” ; जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
- Travel Guide | हिवाळ्यामध्ये जोडीदारासोबत फिरायचा प्लॅन करत असाल, तर नॉर्थ-ईस्ट मधील ‘ही’ ठिकाणं आहेत परफेक्ट डेस्टिनेशन
- Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप, सुप्रिया सुळे म्हणाल्या…
- Vidya Chavan | हा विनयभंगाचा गुन्हा होऊ शकत नाही, मी कोर्टात जाणार – विद्या चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
