Share

Vidya Chavan | “…तर मुंबईत दिवसाला लाखोंमध्ये गुन्हे दाखल होतील” ; विद्या चव्हाण यांचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

Vidya Chavan | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना दोन दिवसांपूर्वी सिनेमागृहात हर हर महादेव या चित्रपटाच्या शोदरम्यान मारहाण केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता त्यांच्यावर विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंब्रा पोलीस (Mumbra Police) ठाण्यात ३५४ अन्वये एफआयआर दाखल केला होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी या प्रकरणात सरकारला कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

विद्या चव्हाण (Vidya Chavan) म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना बदनाम करण्यासाठी राज्य सरकारकडून, गृहखात्याकडून अथवा पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर केला जात असेल तर या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ. एखाद्या महिलेला गर्दीतून बाजूला करणे हा गुन्हा असेल तर मुंबई शहरात प्रत्येक दिवसाला लाखोंमध्ये गुन्हे दाखल होतील. त्यामुळे गृह खात्याचा असा गैरवापर होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हे खात त्यांच्याकडे घ्यावे.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आव्हाडांना राजीनामा न देण्याचे आवाहन केले आहे.  सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मतदारसंघात चांगल काम केलं आहे. त्यामुळे लोकांसाठी त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ नये. आमची आव्हाडांना विनंती आहे की त्यांनी लढलं पाहिजे. ही लढाई खोट्या केसेस विरुद्ध आहे. राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे का? तिथे मुख्यमंत्री आहेत, खासदार श्रिकांत शिंदे आहेत, पोलीस यंत्रणा आहे. अशावेळी आरोप होतात, हे वेदनादायी आहे. असे आरोप होतात तेव्हा फक्त समाज नाही तर महिलांचेही यात नुकसान होत.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान (Fauzia Khan) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मित्र पक्ष व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाकडून लोक महिलांबद्दल होणारे एका मागून एक अपमानास्पद भाष्य करू लागेल आहेत. या गोष्टीची वेदना सर्व महिला लोकप्रतिनिधींमध्ये होत आहे. या विषयी राज्यपाल महोदयांनी सत्ताधाऱ्यांना समज द्यावी तसेच संविधानिक शपथ घेताना काही कायदे आणून महिलांचा सन्मान करण्यात यावा अशी भूमिका घ्यावी, ही मागणीही करण्यात आली असे फौजिया खान (Fauzia Khan) यांनी माध्यमांना सांगितले.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांवर बोलताना फौजिया खान म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृतीत कोणतीही विनयभंगाची गोष्ट नव्हती हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. लोकप्रतिनिधी यातून राजीनामा देण्याची भूमिका घेतो ही राज्याची शोकांतिका आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!