Share

Jayant Patil | “तक्रारीपूर्वी ‘ती’ महिला एकनाथ शिंदेंना भेटली” ; जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

Jayant Patil | मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर 72 तासात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर लावलेले आरोप आणि गुन्हे खोटे आहेत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा केली. आव्हाडांनी राजीनामा देऊ नये, असं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं.

पण आव्हाड आपल्या निर्णयावर ठाम होते आणि अखेर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी विशिष्ट हेतूने हा स्पर्श केल्याचा आरोप सदर भाजप पदाधिकारी रीदा राशिद यांनी केलाय. मुख्यमंत्री गाडीत बसले असताना अशी कृती कुणी करू शकतं का? असा सवाल जयंत पाटील यांनी केलाय. पुढे ते म्हणाले, एवढी गर्दी तिथे आहे. पोलीस आहेत. त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्राने सरकार कसं चाललंय, याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यावर महाराष्ट्र विचार करेल, असा माझा विश्वास आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

तसेच ही घटना घडल्यानंतर रात्री 12 वाजेनंतर सदर महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या दरम्यान ती महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटली, अशी माहितीही मिळाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाड यांच्याविरोधात कोण षडयंत्र रचतंय, हे कळण्यासाठी महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!