🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) तील वातावरण हे फिरण्यासाठी (Travel) उत्तम वातावरण असते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये हलकी थंडी आणि कोमट उन्हात आपल्याला आपल्या जोडीदारासोबत देखील फिरायला आवडते. त्यामुळे थंडी सुरू होतास आपण आपल्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे प्लॅन करायला लागतो. तुम्ही देखील या गुलाबी थंडीमध्ये आपल्या जोडीदारासोबत कुठेतरी रोमँटिक ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाता येणाऱ्या ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत.
जोरहाट
भारतातील ईशान्येकडील ठिकाण देशातच नव्हे तर परदेशात देखील प्रसिद्ध आहे. यामध्ये एक ठिकाण म्हणजे जोरहाट. आसाम राज्यामध्ये वसलेले जोरहाट शहर निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. हिवाळ्यामध्ये या ठिकाणी हवामान अतिशय अल्हाददायक आणि सुंदर असते. त्यामुळे जर या गुलाबी थंडीमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर जोरहाट हे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. इथे तुम्हाला माजुली बेट, जगातील सर्वात मोठे नदी बेट, गिब्बन वन्यजीव अभयारण्य इत्यादी ठिकाणी भेट देऊ शकता.
झीरो व्हॅली
भारतातील नॉर्थ ईस्ट भागांमध्ये एकापेक्षा एक अद्भुत आणि सुंदर व्हॅली आहेत. त्यामध्ये झीरो व्हॅली चा देखील समावेश होतो. झीरो व्हॅलीला अरुणाचल प्रदेश राज्यातील नंदनवन म्हटले जाते. या छोट्याशा व्हॅलीमध्ये फिरताना तुम्ही अनोख्या ठिकाणाचा फेरफटका माराल. त्याचबरोबर या ठिकाणचे वातावरण आणि निसर्ग सौंदर्य गळ्यामध्ये जोडीदारांसोबत फिरायला सर्वोत्तम आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सर्वोत्तम क्षण घालू शकता.
भालूकपोंग
तुम्हाला जर निवांत आणि शांत ठिकाणी तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही भालूकपोंग ट्रीपचा प्लॅन करू शकता. अरुणाचल प्रदेश राज्यात स्थित असलेले हे ठिकाण अतिशय सुंदर आणि शांत आहे. त्याचबरोबर जोडीदारासोबत भेट द्यायला हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप, सुप्रिया सुळे म्हणाल्या…
- Vidya Chavan | हा विनयभंगाचा गुन्हा होऊ शकत नाही, मी कोर्टात जाणार – विद्या चव्हाण
- Rida Rashid | जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा नोंदवणाऱ्या रीदा राशीद यांची पहिली प्रतिक्रिया
- Jaya Bachchan | महिलांचा अपमान आम्ही सहन करणार नाही – जया बच्चन
- Winter Care Tips | हिवाळ्यामध्ये दररोज आंघोळ करत नसाल, तर त्याचेही आहेत अनेक फायदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
