Share

नांदेड जिल्ह्यात संचारबंदीतही ३५ हजारांची दारु जप्त

Published On: 

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्याने सध्या जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. पण या संचारबंदीत ही अवैध धंदे बंद होण्याचं नाव घेत नाही आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीची घोषणा करताच जिल्ह्यातील सर्व दारु दुकाने बंद झाली. मात्र बेकायदा व जादा दराने सर्रास दारु विक्री होत आहे. दारु तस्करी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या ५ ठिकाणी धाडी टाकून ३५ हजार रुपयांची बेकायदेशीर दारु जप्त केली आहे.

देगलूर तालुक्यातील शिवणी येथे आरोपीकडून विना परवाना २ हजार ४९६ रुपये किंमतीची देशी दारु जप्त केली. या प्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात ५७/२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील तुप्पा पाटी बसस्थानक येथे यातील नमूद आरोपींकडून १४ हजार २०४ रुपये किंमतीची देशी व विदेशी दारु जप्त केली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात २०२/२१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मुदखेड तालुक्यातील माळकोठा शिवारात यातील नमूद आरोपीकडून विना परवाना २०० लिटर रसायन जप्त केले. या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात ५५/२१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुखेड येथील रॉयल धाबा परतपूर येथे आरोपी बेकायकदेशीर ५ हजार २०१ रुपयांची विदेशी दारु जप्त केली. या प्रकरणी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात ५३/२१ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!