कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. भाजपा आणि टीएमसी यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत.
सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवून ठेवली असतांना उर्वरित सात टप्प्यातील प्रचार देखील जोरात सुरु आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी मंडळी प्रचाराला उतरली आहेत. त्यात तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांची जोरदार चर्चा आहे. तर नुसरत जहाँ यांनी प्रचारसभेदरम्यान केलेल्या वक्तव्यावर भाजपाकडून खोचक टीका केली जात आहे.
प्रचार करत असताना सोमवारी मात्र त्या चांगल्याच वैतागल्याहोत्या. एवढंच नाही, तर आपल्याच पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यावर त्या चांगल्याच वैतागल्या. म्हणाल्या, “मी मुख्यमंत्र्यांसाठीही एवढा प्रचार करत नाही!” या नंतर आयतं कोलीत मिळालेल्या भाजपने यावरून तृणमूल काँग्रेस ट्रोल केल आहे.
TMC MP Nusrat Jahan " I can't do rally for more than 1 hour, I don't even do it for CM"???? #MamataLosingNandigram pic.twitter.com/p0jOm4iy03
— BJP West Bengal (@BJP4Bengal) March 28, 2021
भाजपाने आपल्या पश्चिम बंगालच्या ट्वीटर हँडलवर नुसरत जहाँ यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसलं, तरी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती या नुसरत जहाँच आहेत, हे स्पष्ट होत आहे.
तर या व्हिडीओमध्ये नुसरत जहाँ यांना पक्षाचा एक कार्यकर्ता अजून थोडा वेळ प्रचारात थांबण्याची विनंती करताना दिसत आहे. पण नुसरत जहाँ मात्र ऐकायला तयार नाहीत. “मेन रोड आता जवळच आहे. इथून फक्त अर्धा किलोमीटर. फक्त थोडा वेळ थांबा”, अशी विनंतीवजा याचना करताना हा कार्यकर्ता व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. पण नुसरत जहाँ मात्र तिथून निघण्यावर ठाम होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचं ठरल ! ‘हा’ नेता उद्या भरणार उमेदवारी अर्ज
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते समाधान अवताडे कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

