Share

‘दिल चाहता है’ च्या २० वर्षपुर्ती निमीत्त फरहानने केली ‘जी ले जरा’ या नव्या चित्रपटाची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडचे लेखक जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तरने २००१ साली ‘दिल चाहता है’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर त्याने डॉन, लक्ष्य यासारखे चित्रपट दिग्दर्शीत केले आहे. यादरम्यान १० ऑगस्ट रोजी ‘दिल चाहता है’ या चित्रपटाला २० वर्षे पुर्ण झाले.

याच मुहुर्तावर फरहान अख्तरने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘जी ले जरा’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. यात प्रियंका चोप्रा, कटरीना कैफ आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे. या चित्रपटाची कथा दिल चाहता है, जिंदगी मिलेगी ना दोबारा प्रमाणे रोड ट्रिपवर आधारीत असणार आहे. मात्र यावेळी ही रोड ट्रिप ही मुलींची असणार आहे. त्यात कटरीना, प्रियंका आणि आलिया सारखी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट फरहान खुद्द दिग्दर्शीत करणार आहे.

पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाद्वारे प्रियंका चोप्रा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. यापुर्वी अशाच धाटणीची कथा असलेले चित्रपट दिल चाहता है, जिंदगी मिलेगी ना दोबारा तुफान गाजले होते. या चित्रपटात तीन मित्र प्रवासासाठी निघतात या प्रवासावर आधारीत या चित्रपटाची कथा होती. आता ‘जी ले जरा’कडूनही प्रेक्षकांना अशीच अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!