🕒 1 min read
नवी दिल्ली: राज्यसभेत मंगळवारी पेगासस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी गदारोळ घातला. यावेळी विरोधी पक्षातील काही खासदार वेलमध्ये जाऊन डेस्कवर चढले आणि आसनाच्या दिशेने नियमपुस्तिका फेकली. तसंच जय जवान जय किसानच्या घोषणादेखील दिल्या. या गोंधळानंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते. या सर्व प्रकारानंतर सभापती व्यंकय्या नायडू आज भावूक झाले होते.
काल काही सदस्य बाकावर बसले आणि काहीजण वरती चढले यामुळे सभागृहाचे पावित्र्य नष्ट झाले. विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही. असे म्हणताना सभापती नायडू भावूक झाले. आणि त्यांना अश्रू अनावर झाले.
Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu gets emotional as he speaks about yesterday's ruckus by Opposition MPs in the House
All sacredness of this House was destroyed yesterday when some members sat on the tables and some climbed on the tables, he says pic.twitter.com/S1UagQieeS
— ANI (@ANI) August 11, 2021
लोकतंत्र के मंदिर संसद में दिशाहीन कांग्रेस एन्ड गैंग का चरित्रहीन मुखोटा देखिये। pic.twitter.com/HEaq7DRFI6
— Parvesh Sahib Singh (@p_sahibsingh) August 10, 2021
दरम्यान या सर्व प्रकारामुळे नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. मला फार वाईट वाटले आहे. खूप दु:खही झाले. मात्र हे दु:ख व्यक्त करण्यासाठी काय करावं मला कळलं नाही.कारण मी रात्रभर झोपलो नाही. हे सगळं घडण्यामागे नेमकं काय होतं हे मला समजत नाही आहे.असे त्यांनी भावूक होऊन म्हटले. दरम्यान राज्यसभेत गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर व्यंकय्या नायडू कारवाई करणार आहेत. याच मुद्द्यावर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सभागृह नेते पियूष गोयल आणि इतर भाजपा खासदारांनी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- ‘खेळाडूंना ओळखण्यासाठी शेजाऱ्याकडून चष्मा उधार घ्यावा लागेल’, सोशल मीडियावरून मोदींवर टीका
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- घटनादुरुस्ती विधेयकसंदर्भात बोलण्याच्या संधीसाठी संभाजीराजेंचे उपराष्ट्रपतींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
