Share

पहिल्या कसोटीतील ‘भोपळा’ पडला महागात ; आयसीसी क्रमवारीत घसरण 

Published On: 

इंग्लंड : नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने जबरदस्त उडी मारली आहे, तर विराट कोहलीला एक स्थान खाली घसरला आहे. रोहित शर्मा आपले स्थान कायम ठेवत आहे. बुमराहने गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा पहिल्या 10 मध्ये प्रवेश केला आहे.

कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहने 10 स्थानांची झेप घेत 19 व्या स्थानावरून 9 वे स्थान मिळवले आहे. बुमराह या सामन्यापूर्वी 683 गुणांसह पहिल्या 20 मध्ये होता, परंतु या सामन्यानंतर त्याचे गुण 760 झाले आहेत आणि तो पुन्हा पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. त्याचवेळी, गोल्डन डकचा शिकार असलेला विराट कोहली चौथ्यावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे आणि चौथे स्थान इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने घेतले आहे, ज्याने पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध अर्धशतक आणि शतक झळकावले होते.

आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप 10 च्या यादीत रूट आणि विराट वर -खाली सरकल्याशिवाय कोणतीही हालचाल झालेली नाही, तर गोलंदाजीमध्ये जेम्स अँडरसनला एक स्थान आणि स्टुअर्ट ब्रॉडला एक स्थान खाली घसरले आहेत. अँडरसन सध्या 7 व्या क्रमांकावर आहे, तर ब्रॉड 8 व्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या टॉप 10 च्या यादीत फक्त एकच बदल झाला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा तिसऱ्या वरून दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे, तर बेन स्टोक्स दुसऱ्यावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासाठी दुसरी कसोटी महत्त्वाची आहे कारण त्यांची फलंदाजी सध्या कठीण स्थितीतून जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!