औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. मात्र अजूनही शहरातील अनेक रस्ते दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. आज (दि.५) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शहरात येत आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र यासाठीच येथील रस्त्यावर गुरुवारी घाईघाईत पॅचवर्क करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि.५) औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी ११:४५ वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन होणार असून १२ वाजता औरंगाबाद पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दिल्ली गेट जलकुंभ कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री आढावा बैठक घेण्यासाठी येत असल्याने महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील खड्डे बूजवुन डागडूगी केली आहे. येथील खड्डे आता पॅचवर्कने कव्हर करण्यात आले आहेत.
मात्र शहराचा इतिहास पाहता वरिष्ठ नेते येणार असल्यावरच शहरात तात्काळ बदल करण्यात येतात. हे तात्पुरते बदल नेते शहरात असेपर्यंतच टिकतात. शहरातील उणीदुखणी मुख्यमंत्री ठाकरेंच्या नजरेस पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- “तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण आता मात्र…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
