पुणे : महाराष्ट्रात सोमवारपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या १८ जिल्ह्यात आता दुकाने, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु केले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या जिल्ह्यात ५० टक्के अनलॉक असेल. 3 जून रोजी संपलेल्या आठवडयाच्या सरासरीनुसार पॉझिटिव्हीटीचे दर आणि भरलेल्या ऑक्सिजन बेडच्या प्रमाणावर प्रत्येक शहरातील प्रशासन त्यांची नियमावली स्वतंत्र काढेल असं सांगण्यात आलं होते.
त्याप्रमाणे पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरासाठी मिशन बिगेन अगेन म्हणजे अनलॉकची नियमावली जाहीर केली असून त्याबाबतचे आदेश आज (शनिवार) काढण्यात आले आहेत. सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहे.
दरम्यान, गेल्या दीड महिन्या पासून सामान्यासाठी खंडित झालेली पीएमपीची बससेवा रविवार पासून पुन्हा सुरू करण्यात आली. रविवारी पहिल्या दिवशी दोन्ही सत्रांत जवळपास ५० हजार पुणेकरांनी पीएमपीचा प्रवास केला. पीएमपी प्रशासनाच्या पहिल्या दिवशी १७९ मार्गावर एकूण ४१६ बसेस धावल्या. यातून जवळपास ५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. पुणे महापालिका व पिपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी शनिवारी पीएमपीला बस सेवा सुरू करण्यास परवानगी दिली.
मात्र बस मध्ये ५० टक्के प्रवासी क्षमता असावी तसेच कोरोना विषयक नियमांचे पालन व्हावे असे सांगितले. त्यानुसार पीएमपीएमएल प्रशासनाने रविवार पासूनच आपल्या १३ डेपोतून बस गाडया बाहेर काढून प्रवासी सेवेला सुरुवात केली. आपल्या एकूण क्षमतेच्या २५ टक्के गाडया रस्त्यावर आणल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात आज १२,५५७ कोरोना रुग्णांची नोंद; बरं होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांवर
- मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांच महत्वाचं विधान
- छत्रपती शिवरायांच्या जगातील पहिल्या अश्वारुढ स्मारकासमोर ३१ फुटी स्वराज्यगुढी
- ‘प्रशासन चालवताना आपण जनतेसाठी आहोत, हे लक्षात ठेवावं यासाठीच शिवस्वराज्य दिन’
- ‘नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात’


