पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनाक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. पहाटेच्या शपथविधी वरून चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बोचरी टीका केली आहे.
यासोबतच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात जात राष्ट्रवादीचे गटनेते असलेल्या अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. माझ्याकडे आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे, असं अजित पवारांनी तेव्हा आम्हाला सांगितल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. याच मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं.
‘शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक आहे,’ असा सवाल करत अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच जुनं झालं तरी खोट आहे ते खोटंच, असा टोलाही त्यांनी लगावला. आता चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.
दिल्लीतील चौकीदारचं लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचं लक्ष सिल्वर ओक च्या ड्राव्हरवर. करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणुन करवीरकरांनी हाकललं,नंतर कोथरूड शोधावं लागलं. नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात.@TV9Marathi https://t.co/SHkl6fRhIr
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 6, 2021
‘दिल्लीतील चौकीदारचं लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचं लक्ष सिल्वर ओक च्या ड्राव्हरवर. करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणुन करवीरकरांनी हाकललं, नंतर कोथरूड शोधावं लागलं. नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात,’ अशी जहरी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ‘कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत, गर्दी होणार नाही याची काळजी घ्या ‘
- मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांच महत्वाचं विधान
- ‘संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर, आरक्षणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा’
- ‘प्रशासन चालवताना आपण जनतेसाठी आहोत, हे लक्षात ठेवावं यासाठीच शिवस्वराज्य दिन’
- मराठा आरक्षणाबाबतच्या अजित पवारांच्या ‘त्या’ विधानात दांभिकपणा; चंद्रकांत पाटलांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

