Share

महाराष्ट्रात आज १२,५५७ कोरोना रुग्णांची नोंद; बरं होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांवर

Published On: 

मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार ५५७ नव्या रुग्णांची भर पडली असून १४ हजार ४३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता ९५.०५ टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज एकूण २३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या आता १ लाख ८५ हजार ५२७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी त्यात सातत्यानं घट होताना दिसत आहे. पुण्यात एकूण २१ हजार २१६ इतके सक्रीय रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार ०४१ इतका आहे.

दरम्यान राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येने लाखाचा आकडा पार केला. आतापर्यंत 1,00,130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 1.72% टक्के एवढा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!