Share

‘फादर्स डे’च्या पूर्वसंध्येला स्नेह राणाने दिवंगत वडिलांना… ‘अशी’ वाहिली श्रद्धांजली

Published On: 

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाने एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले आहे. पहिल्या डावातील अपयश भारतीय महिलांनी दुसऱ्या डावात झुंजार खेळी करत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. पहिल्या डावातील 165 धावांच्या आघाडी मिळाल्यानंतर इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात भारतीय संघाला लवकर बाद करुन सामना जिंकण्याचे इंग्लंडचे स्वप्न महिला खेळाडुंनी धुळीस मिळवले.

रविवारी 20 जुन रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जातो. मात्र भारतीय संघाची खेळाडू स्नेह राणाने एक दिवस अधिच तिच्या दिवंगत वडिलांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. भारताचा पराभव टाळण्यासाठी निर्णायक खेळी करत इंग्लंडच्या विजयाचा घास हिरावुन घेतला. इंग्लंड दौऱ्यापुर्वी काही दिवस अधीच तिने तिच्या वडिलांना गमावले होते. तिच्या वडिलांची इच्छा होती की तिने पुन्हा भारतासाठी खेळावे. कारण खराब कामगीरीमुळे स्नेह राणा ही 5 वर्षापुर्वी संघातुन बाहेर गेली होती. मात्र यादरम्यान तिने स्थानीक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत 5 वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. मात्र भारतीय संघात निवड होण्यापुर्वी काही दिवसापुर्वी तिच्या वडिलांचे दुर्दैवी निधन झाले.

या सामन्यात इंग्लंडच्या विजयाच्या आड उभी होती ती भारतीय खेळाडू स्नेह राणा. एकवेळ 199 वर 7 बाद अशा स्थिती असताना आठव्या क्रमांकावर येत स्नेह राणाने 80 धावांची झुंझार खेळी केली आणि भारतीय संघाला पराभवाच्या खाईतुन बाहेर काढले. स्नेह राणाने 154 चेंडुचा सामना करताना 80 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीने भारतीय संघाने 7 बाद 199 वरुन 8 बाद 344 अशी मजल मारली आणि इंग्लंडचा विजयाचा घास हिरावुन घेतला. तसेच तिने इंग्लंडच्या पहिल्या डावात 4 गडी बाद करत गोलंदाजीतही हातभार लावला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!