Share

मातृदिनादिवशी धनश्रीने शेअर केला आईचा भन्नाट डान्स ; लिहिली भावनिक पोस्ट

Published On: 

मुंबई : दरवर्षी, मे महिन्याच्या दुसरा रविवार हा मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी मातृदिन 9 मे रोजी साजरा केला जातो. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे आपण नेहमीच म्हणतो. खरं आहे, आई आजूबाजूला नसेल तर काहीच सुचत नाही. बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. बाकी कोणी घरात आहे की नाही हे सर्वात पहिले डोक्यात येतच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आईची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. अशाच आईसाठी काल मातृदिनाच्या निमित्ताने सर्वांनीच आपल्या आईला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी चहलची पत्नी धनश्रीने देखील एक खूप सूंदर पोस्ट शेअर केली आहे. मातृदिनाच्यादिवशी धनश्रीने आपल्या आईचा एक भन्नाट डान्स इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘स्ट्रीट डान्सर थ्री डी’ चित्रपटातील ‘मेरा नखरा है तिखी तलवार वरगा’ या गाण्यावर धनश्रीची आई वर्षा वर्माने शानदार डान्स केला आहे.

https://www.instagram.com/p/COpVEfglHLJ/?utm_source=ig_web_copy_link

या सोबत तिने भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. ‘आई तुझ्यासोबतचे माझे अनेक फोटो आहेत. पण हा डान्स याचा साक्षीदार आहे की तू माझ्या आयुष्यात मला कशा प्रकारे सुख देते. माझ्या आयुष्यातील सगळ्या सुपर वूमनला जागतिक मातृ दिनाला शुभेच्छा… ‘

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!