🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझा डाॅक्टर या नावाने मोहिम सुरू केली आहे. यामध्ये फॅमिली डॉक्टरांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. तसेच या फॅमिली डॉक्टरांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी मैदानात उतरावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केलीय.
या संबंधी अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेचा समाचार घेतलाय. ते म्हणाले की, ‘सर्वसामान्यांसाठी ‘माझा डॉक्टर’ म्हणून मैदानात उतरावं” हे मुख्यमंत्र्यांचं राज्यातल्या डॉक्टरांना आवाहन म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असला किळसवाणा प्रकार आहे. मी कडी लावून घरातच बसणार तुम्ही मैदानात उतारा अशी ही मानसिकता.’
“सर्वसामान्यांसाठी ‘माझा डॉक्टर’ म्हणून मैदानात उतरावं” हे मुख्यमंत्र्यांचं राज्यातल्या डॉक्टरांना आवाहन म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असला किळसवाणा प्रकार आहे.
मी कडी लावून घरातच बसणार तुम्ही मैदानात उतारा अशी ही मानसिकता. pic.twitter.com/O4FBykiiVK— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 9, 2021
कोरोना रुग्णांना उपचारासाठी सेवा सुविधा पुरवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले असल्याची टीका भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री हे घरात बसूनच काम करत असल्याची टीकाही केली जातेय. त्यात आता तिसऱ्या लोटेची भीती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र सावरतोय : नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट तर ६० हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
- लोकांना भेटायला मी काय सरपंच आहे का ?, शिवसेना खासदाराचे बेताल वक्तव्य !
- ‘गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती’
- ‘देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाच व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज’
- ‘खट्याळ मुलं पण शांत होतात, पण यांचा थयथयाट थांबत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
